Raj Thackeray : ‘मुंबई’ नावावरून केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी घेतला समाचार; म्हणाले ‘हे नाव खटकतं कारण…’

राज ठाकरे यांनी इशारा देताना म्हटलं, “‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे.

Raj Thackeray : ‘मुंबई’ नावावरून केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी घेतला समाचार; म्हणाले ‘हे नाव खटकतं कारण…’

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील आयआयटी कार्यक्रमात बोलताना जितेंद्र सिंग यांनी “आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं” असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मराठी जनतेला उद्देशून आपली प्रतिक्रिया सविस्तर मांडली आहे. राज ठाकरे म्हणाले “जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!”

ते पुढे म्हणाले, “खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.” मराठी जनतेला थेट आवाहन करत राज ठाकरे म्हणाले, “या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.”

हेही वाचा: Indian Cricket Team: भारताच्या खराब खेळावर कोहलीच्या भावाची कडवी प्रतिक्रिया; गभीरांच्या नेतृत्वावर उपस्तितीत केले प्रश्नचिन्ह

चंदीगड प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं “आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार.” राज ठाकरे यांनी इशारा देताना म्हटलं, “‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक, उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे हे आपण रोज पाहतो आहोतच!” शेवटी राज ठाकरे यांनी स्पष्ट संदेश दिला, “आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं!” 

राज ठाकरे यांच्या या तीव्र भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून ‘मुंबई’ नाव आणि तिच्या ओळखीवरून सुरू झालेल्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. त्यांच्या इशाऱ्यानंतर मराठी जनतेतही या मुद्द्यावर जागरूकता वाढताना दिसत आहे. आता केंद्र सरकारकडून या वादाला कोणते उत्तर येते आणि पुढील राजकीय घडामोडी कशा घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: CM Of Karnataka : कर्नाटकात सत्ता स्थापनेवरून तणाव; डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number