भैय्याजींच्या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून निषेध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निषेध केला आहे.

भैय्याजींच्या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून निषेध

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत भैय्या जोशींच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. 

राज यांनी केलेली पोस्ट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैय्याजी जोशींना माहित नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? असा सवाल राज यांनी केला आहे. 

हेही वाचा : 'मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं …'; वक्तव्य पडलं महागात
भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असा प्रश्न त्यांनी भाजपालाही केला आहे.

सध्या एमएमआर रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरू होताना दिसत आहेत. हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव? 
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला, त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते. तर मग जोशी बुवांना हे समजू नये? या असल्या काड्या घालून  (अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणे नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे! बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं! असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number