अखेर भंडाऱ्यात पाऊस 

भंडारा जिल्ह्यात अखेर बुधवारी पावसाने हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती.

अखेर भंडाऱ्यात पाऊस 

१७ जुलै, २०२४ भंडारा : भंडारा जिल्ह्यात अखेर बुधवारी पावसाने हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे, शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले परे वाळण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली असून शेतामध्ये पऱ्यांना पाण्याची गरज असते. तीन दिवस सलग पावसाने भंडारा जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट येत आहे की काय अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये होती. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अखेर बुधवारी जिल्ह्यात पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number