Rahuri Bypoll Election : राहुरी पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले सज्ज, वडिलांच्या आठवणीने झाले भावूक; म्हणाले, ‘आज साहेब असते तर…’

दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्या वारशावर ही निवडणूक लढवली जात असून राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

Rahuri Bypoll Election : राहुरी पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले सज्ज, वडिलांच्या आठवणीने झाले भावूक; म्हणाले, ‘आज साहेब असते तर…’

अहिल्यानगर: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून अक्षय कर्डिले यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. अक्षय कर्डिले हे दिवंगत नेते शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र आहेत. शिवाजी कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून राज्याच्या राजकारणात या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

“पक्षाचा विश्वास, वडिलांच्या कार्याची देण”

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अक्षय कर्डिले भावूक झाले. ते म्हणाले, “मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास हा माझ्या वडिलांच्या कार्याची देण आहे.” ते पुढे म्हणाले, “तिकीट जाहीर झाल्यावर सर्वात जास्त आठवण माझ्या वडिलांची आली. आज ते असते, तर त्यांनाही खूप आनंद झाला असता.” या संधीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

हेही वाचा: Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाचा नवा ‘रूट’; साताऱ्यातूनही धावणार, लांबी 856 किलोमीटर, वाचा काय आहेत मोठे बदल?

“मतदारसंघात वडिलांची नाळ अजूनही जिवंत”

अक्षय कर्डिले म्हणाले, “माझ्या वडिलांनी 35 वर्षांत मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीशी नाळ जोडली. आजही मी जिथे जातो, तिथे त्यांच्या कार्याच्या आठवणी जिवंत आहेत. मतदारसंघातील जनता माझ्यासोबत उभी आहे, हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.”

ते पुढे म्हणाले की, “ही निवडणूक म्हणून न पाहता आम्ही साहेबांच्या कार्याची पुढची पायरी म्हणून पाहत आहोत. प्रत्येक मतदार माझ्याकडे जबाबदारी म्हणून पाहत आहे आणि ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.”

मातोश्रीही भावूक

दरम्यान, जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना अक्षय कर्डिले यांच्या मातोश्रीही भावूक झाल्या. “आमचा जनतेवर पूर्ण विश्वास आहे. जनता आमची साथ सोडणार नाही,” असे त्या म्हणाल्या.

पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष

राहुरी पोटनिवडणूक ही राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात असून, दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्या कार्याला मतदार कितपत साथ देतात, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा: Global Trade Impact: युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंत ‘या’ उत्पादनांवर सीमाशुल्क पूर्णपणे माफ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number