गेले दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आवाहनं केली आहेत. यामध्ये त्यांनी जनतेला इंधन बचतीबरोबरच वर्षभर सोनं खरेदी न करण्याचेदेखील आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम करावे असेही त्यांनी आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे आता इंधन बचतीवरून विरोधकांनी मंत्र्यांच्या अलिशान गाड्या वापरण्यावरून आणि परदेश दौऱ्यावरूनही निशाणा साधला. याबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी इंधनबचत व्हावी यासाठी एका वर्षासाठी परदेश दौरे रद्द करावेत असे आवाहन केले होते. यानुसार आता राज्य सरकारकडून वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, विधीमंडळाचे 12 आमदार जपान दौऱ्यावर जाणार होते. मात्र पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर आमदारांनी जपान दौरा रद्द केला आहे. याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जपानच्या दोन राज्यांतील गव्हर्नरकडून भेटीचे निमंत्रण आले होते. या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील 12 आमदारांचे शिष्टमंडळ जाणार होते. पण पीएम मोदींच्या आवाहनानंतर त्यांनी दौरा रद्द केला. मात्र महाराष्ट्रातील आमदारांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. विधीमंडळ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द केला आहे.
पंतप्रधानांनी काय आवाहन केलं होतं?
आखाती देशातील युद्धाचा परिणामांची झळ आता भारताला बसत आहे. देशात सध्या इंधन टंचाईचे सावट आहे. त्यामुळे वाहनांचा कमी वापर करण्यात यावा असं आवाहन केले आहे. परदेशात लग्न करणे, परदेशात प्रवास करणे आणि परदेशात सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी जाणं ही संस्कृती मध्यमवर्गामध्ये प्रचलित होत आहे. पण आपण ठरवले पाहिजे की या संकटाच्या काळात आपण परदेश प्रवास किमान एक वर्षासाठी पुढे ढकलला पाहिजे, असं सांगितलं आहे.