काल म्हणजेच 4 मे रोजी पाच राज्यातील विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये तीन राज्यात भाजपची सत्ता आली. त्यातील पश्चिम बंगालमधील विजय हा भाजपासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या विजयामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. या पराभवाचे खापर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर फोडले आहे. तसेच मतचोरीचादेखील आरोप लावला आहे. यावरून आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकीवरुन भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी भाजपनं निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यावर आसाम आणि बंगालची निवडणूक चोरल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे की, राहुल गांधी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, आसाम आणि बंगाल ही भाजपनं निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यावर निवडणूक चोरी केल्याची स्पष्ट उदाहरणं आहेत. आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत सहमत आहोत. बंगालमध्ये 100 जागांची चोरी झाली.
आपण या प्रकारचा खेळ यापूर्वी मध्यप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि लोकसभा निवडणूक 2024 इत्यादीमध्ये पाहिल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. निवडणूक चोरी, संस्था चोरी, आता काय मार्ग राहिलाय?”, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुक प्रमुख ए.के. स्टॅलिन यांच्यासोबत राहुल गांधी यांनी चर्चा केली. याशिवाय राहुल गांधी यांनी तामिळनाडूमध्ये विजय मिळवणाऱ्या टीव्हीके पक्षाचे नेते विजय यांच्यासोबत चर्चा केली.
Assam and Bengal are clear cases of the election being stolen by the BJP with the support of the EC. We agree with Mamata ji. More than 100 seats were stolen in Bengal. We have seen this playbook before:
Madhya Pradesh.
Haryana.
Maharashtra.
Lok Sabha 2024 etc चुनाव चोरी,… — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2026