राहुल गांधींना भोवणार फ्लाईंग किस ?

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिला खासदारांकडे बघत फ्लाईंग किस दिला. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदारांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीमुळे राहुल गांधी यांना फ्लाईंग किस भोवणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी लोकसभेत अविश्वास सादर केला आहे. या प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल गांधी यांचे भाषण झाले. […]

राहुल गांधींना भोवणार फ्लाईंग किस ?

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिला खासदारांकडे बघत फ्लाईंग किस दिला. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदारांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीमुळे राहुल गांधी यांना फ्लाईंग किस भोवणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी लोकसभेत अविश्वास सादर केला आहे. या प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल गांधी यांचे भाषण झाले. जेमतेम ३० – ४० मिनिटे राहुल गांधींचे भाषण झाले. या भाषणादरम्यान थोडा वेळ गदारोळात वाया गेला. राहुल गांधी यांनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करून टीकाटिप्पणी सुरू केली. यानंतर गदारोळ झाला.

राहुल गांधी मोदींना रावणाची तर अमित शाह यांना कुंभकर्णाची उपमा दिली. यानंतर गदारोळ वाढला. या गदारोळात स्मृती इराणी यांचे भाषण सुरू झाले. स्मृती इराणी यांचे भाषण सुरू होताच राहुल गांधी फ्लाईंग किस करून सभागृहातून निघून गेले.

राहुल गांधी यांच्या कृतीवर स्मृती इराणी यांनी लोकसभेत बोलताना जाहीरपणे नाराजी व्यक्ती केली. भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या वर्तनाविषयी तक्रार केली.

याआधी काही महिन्यांपूर्वी संसदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली होती. या कृतीनंतर परत स्वतःच्या आसनावर बसताना राहुल गांधी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडे बघत डोळा मारला होता. आता राहुल गांधी यांनी सभागृहातून बाहेर पडताना फ्लाईंग किस केला. प्रत्येकवेळी अनपेक्षित कृती करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी किस प्रकरणात फक्त चर्चेत राहतात की अडचणीत येतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number