राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल

Rahul Dravid Video Viral : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची कार आणि ऑटोरिक्षाची धडक झाली. यानंतर द्रविडचा भररस्त्यात वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार बंगळुरूमध्ये घडला.

राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल

बंगळुरु : भारताचे महान फलंदाज आणि टीम इंडियाचे टी-20 विश्वचषक विजेते माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये द्रविड भररस्त्यात त्यांच्या कारची पाहणी करत रिक्षा चालकाशी वाद घालताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?
राहुल द्रविड यांच्या कारची आणि सामानाने भरलेल्या एका ऑटो रिक्षाची धडक झाली. यानंतर द्रविड रिक्षाचालकाशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे द्रविड नाराज झालेले यात दिसत आहेत. ही घटना मंगळवारी संध्याकाळची आहे. व्हिडिओमध्ये द्रविड आपल्या मूळ कन्नड भाषेत रिक्षावाल्याशी वाद घातलाना दिसत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ केला.

हेही वाचा – ‘माझी बायको बघत असेल…’ रोहित शर्माचं स्मृती मंधानाच्या ‘त्या’ प्रश्नावर उत्तर, सर्वांनाच आलं हसू

धडक झाल्यानंतर राहुल यांच्या कारचं थोडं नुकसान झालं. त्यामुळे ते संतापलेले दिसले. या रिक्षा आणि कारच्या धडकेदरम्यान कोणालाही दुखापत झालेली नाही, दुपारी ४ च्या दरम्यान ही घटना कनिंगहम रोड बंगळुरूमध्ये घडली.

राहुल द्रविडचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी ‘इंदिरानगर का गुंडा’, ‘इंदिरानगर का गुंडा व्हाईबस’, ‘द्रविडला कोणीच कसं ओळखलं नाही’, ‘ड्रायव्हर कोणाशी वाद घालतोय त्याला कळतंय का’, अशा पद्धतीच्या विविध कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा – सानिया मिर्झाने दुबईतील घरातून शोएब मलिकचं नाव हटवलं, आता लिहिलंय ‘या’ व्यक्तीचं नाव

समोर आलेल्या माहितीनुसार, रिक्षाने राहुल द्रविडच्या कारला मागून धडक दिली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, राहुल द्रविड खाली उतरून त्याच्या कारची पाहणी करत असल्याचे दिसत आहेत. रिक्षाचालकही द्रविडबरोबर वाद घालत घडलेली घटना सांगत आहे. या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number