चिखली विधानसभेचे विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे भाजपाच्या वाटेवर

राज्यात सद्या भाजप मध्ये जोरदार इंकमिंग सुरू आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिगग्ज आता पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. असे असतानाच आता बुलडाणा जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखली विधानसभेचे विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंट पोस्टमुळे जिल्ह्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले असून राहुल बोन्द्रे भाजप प्रवेश करतात की काय […]

चिखली विधानसभेचे विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे भाजपाच्या वाटेवर
राज्यात सद्या भाजप मध्ये जोरदार इंकमिंग सुरू आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिगग्ज आता पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. असे असतानाच आता बुलडाणा जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखली विधानसभेचे विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंट पोस्टमुळे जिल्ह्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले असून राहुल बोन्द्रे भाजप प्रवेश करतात की काय या चर्चांना उधाण आले आहे.

काय आहे फेसबूक पोस्ट

राहुल बोन्द्रे यांनी चिखली तालुक्यातील निझनेश्वर येथील प्रसिध्द महादेवाच्या मंदिरात सपत्नीक दर्शन घेऊन एक पोस्ट फेसबुक वर टाकली त्यात “महादेवा मला मार्ग दाखव” आणि महादेवा, माझ्या मार्गावर प्रकाश टाक” अशा आशयाचे दोन वाक्य टाकत फेसबुक पोस्ट केली. या पोस्टने राहुल बोन्द्रे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत की काय या चर्चेने जिल्ह्यासह दिल्ली हादरली आहे.

तर येत्या 24 तारखेला मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा देखील जिल्ह्यात आहे बोन्द्रे त्यावेळी भाजप प्रवेश करून काँग्रेस ला धक्का देते की काय असा प्रश्न आता काँग्रेस च्या गोटात सुरू आहे. काँग्रेस मधून भाजप गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय देखील राहुल बोन्द्रे हे मानले जातात.

राहुल बोन्द्रे एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी बुलडाणा जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष पदाची कमान बोन्द्रे यांना सोपवली होती.परंतु त्यांच्या फेसबुक पोष्ट वरून बोन्द्रे हे काँग्रेस मध्ये अस्वतः असल्याचं समोर येतंय अशा प्रकारची आपल्या स्वतःच्या फेसबुक वरून महादेवाला साकडे टाकत मला मार्ग दाखव असे बोलणारे बोन्द्रे नक्कीच काँग्रेस मध्ये अस्वतः आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number