राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरदेखील ताण येत असल्याचं सर्वत्र पाहायला मिळत आहे.
पुण्यात गरिबांसाठी वरदान असलेल्या ससून रुग्णालयाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये एका खाटेवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेताना दिसत आहेत. इतकच नाही तर जमिनीवर बसूनसुद्धा काहीजण उपचार घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण आणि भीषण परिस्थिती स्पष्ट होत आहे.
पुण्यातील कोरोना रुग्ण वाढत असताना प्रशासन यंत्रणा ससून रुग्णालयातील खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासोबत मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन वैद्यकीय उपचार यंत्रणा, कर्मचारी वर्ग न देता फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपल्या मागण्यांचा विचार केला नाही, तर काम बंद करण्याचा इशारा येथील निवासी डॉक्टरांनी दिला आहे