Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? प्रशांत जगतापांचं महत्त्वाचं विधान; शरद पवारांच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष

प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुणे शहरातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीचा सविस्तर आढावा त्यांच्यासमोर मांडला.

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?  प्रशांत जगतापांचं महत्त्वाचं विधान; शरद पवारांच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन लढणार नाहीत. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की पुणे आणि राज्यातील निवडणुका महाविकास आघाडी मार्फतच लढवल्या जातील.

प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुणे शहरातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीचा सविस्तर आढावा त्यांच्यासमोर मांडला. विविध शक्यता तपासल्यानंतर शरद पवार यांनी स्पष्ट केले की, “महापालिका निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत.” या चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे जगताप यांनी सांगितले.

जगताप म्हणाले की, पक्षात वेगळी भूमिका किंवा वेगळा विचार नाही. “सगळ्यांची मते आम्ही शरद पवार यांच्या समोर मांडली. परंतु अंतिम निर्णय असा झाला की पुणे महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्यात पक्षाचे हित आहे,” असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी जगताप यांनी “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी पदाचा राजीनामा देईन” असा कठोर पवित्राही घेतला होता. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर झालेल्या निर्णयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा: India vs South Africa 3rd ODI: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज अंतिम लढत! कोहली-रोहित नवे विक्रम गाठणार?

दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. तेथील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी शरद पवार यांना भेटून स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन “अजित पवार गटासोबत एकत्र लढण्याचा विचार करावा” अशी भूमिका मांडली. तर पुण्यात प्रभारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महाविकास आघाडीच्याच सूत्रावर आग्रह धरला. या दोन्ही शहराध्यक्षांच्या विरोधी भूमिकेमुळे पक्षात तात्पुरता गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अनेक ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते एकत्रित काम करताना दिसून आले होते. त्यामुळे पुण्यातही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रशांत जगताप यांनी या चर्चांना आज पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार यांनी मात्र स्पष्ट भूमिका घेत पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण या तीनही ठिकाणी महाविकास आघाडीच्या बॅनरखालीच निवडणूक लढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी गटातील अंतर्गत समीकरणे कशी बदलतात आणि निवडणूक प्रचारात याचा काय परिणाम दिसतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Indigo Flight Cancellation : 1000 हून अधिक उड्डाणे रद्द; सुप्रिया सुळेंची इंडिगोवर कारवाई करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number