Pune Nasrapur Crime Case : ‘त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे…’, नसरापूर अत्याचार प्रकरणावर आरोपीच्या पत्नीचा संताप, स्वत:च्या मुलींबरोबर….

गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या बातम्या नंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी प्रतिनिधीशी संपर्क केला त्यानंतर आरोपीला मारून टाका असे म्हणत त्यांनी सुद्धा आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Pune Nasrapur Crime Case : ‘त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे…’, नसरापूर अत्याचार प्रकरणावर आरोपीच्या पत्नीचा संताप, स्वत:च्या मुलींबरोबर….

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर या घटनेतील आरोपीचे कुटुंबीय पहिल्यांदाच  कॅमेऱ्यासमोर आले आहेत. गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या बातम्या नंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी प्रतिनिधीशी संपर्क केला त्यानंतर आरोपीला मारून टाका असे म्हणत त्यांनी सुद्धा आक्रमक प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळत आहे. 

काय म्हणाली आरोपीची पत्नी? 
यावेळी आरोपीची पत्नी म्हणाली की, "ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे. मला अकरा नातवंड आहेत. घटना घडल्यापासून मी अन्न पाणी घेत नाही. त्या बाळाचा आत्मा काय म्हणाला असेल.  त्या बाळाच्या घरच्यांना, तिच्या आईला काय वाटत असेल? मी पण कुणाची तरी आईच आहे.

पुढे त्याची पत्नी म्हणाली की, "दहा वर्षापासून त्याचा संपर्क नाही. तो घरी राहत नाही.आम्ही दोघेच माय लेकरं राहतो. दहा वर्षात त्याला आम्ही घरी बोलावण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणाला तुझं तू बघ. त्यानी 65 वर्ष महिलेवर अत्याचार केले तेव्हा, हा मुलगा माझ्या पोटात होता. याआधी त्याच्यावर झालेले अत्याचाराचे आरोप- घटना मला माहिती आहेत, मान्य आहेत. तो मोलमजुरी करून खात होता. तो गावातील इतर महिलांच्या घरात लपून बसून, घरात कुणी चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करायचा या गावकऱ्यांच्या आरोपाबद्दल मला माहिती नाही. तो तसं करत असेल तर मला माहिती नाही. कुठल्या महिलेने सुद्धा माझ्यापर्यंत हे पोहोचवलं नाही. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यानी माझ्या मुलीवर अत्याचार केला असता तर त्याची तक्रार मी स्वतः केली असती. माझ्या पोरींवर असं झालं असतं तर मी गप बसली असते का? मला सात पोरी आहेत. मी स्वतः गप बसले नसते. मला या गोष्टीचा खूप राग आहे. माझ्या पोरी मोलमजुरी करून पोट भरत होत्या. माझ्या पोरींवर तो अत्याचार करायचा हे गावकऱ्यांचे आरोप चुकीचे आहेत. बदनामी करत आहेत अशी घटना झाली असती तर हे कुठल्या आईला सहन होईल. बाहेर तो काय करायचा याबद्दल मला माहिती नाही. पण त्याने घरात माझ्या मुलींसोबत काहीही केलेलं नव्हतं. मुलींवर अत्याचार करायचा आहे आरोप खोटे आहेत".

 नंतर त्या म्हणाल्या की, "जमीन जुमला विकायचा होता म्हणून त्याच्या थोरल्या भावानं पैसे देऊन त्याला जेलमधून बाहेर काढला. ज्या जागी ह्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे,  असं म्हणतं ढसा ढसा रडल्या. मला वेदना होत आहे. अंगाचा लटपट उडतोय नाव ऐकलं तरी". 

काय म्हणाला आरोपीचा मुलगा? 
याचवेळी आरोपीच्या मुलानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. मुलगा म्हणाला की, "तो माझा बाप आहे हीच माझी चुकी आहे.. त्यानी चिमूरड्यावर केलेल्या अत्याचाराचा मी जाहीर निषेध करतो.. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करा असे मी सरकारला आवाहन करतो". 

"मी त्याचा मुलगा आहे हे माझं मोठं दुर्दैव आहे. त्या चिमुरडीला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना ह्याला झाल्या पाहिजेत. याला लोकांच्या हवाली केले पाहिजे आणि ठेचून मारला पाहिजे. त्याने स्वतःच्या पुतणीवर अत्याचार केला तेव्हा मी नववीत होतो. तेव्हा मला समज होती. तेव्हा आम्हाला घरदार सोडून जावं लागलं होतं. त्यानंतर मला बाप म्हणजे काय माहितीच नाही. त्याच्यासोबत संबंध संपवला होता.

"आज माझ्या सात बहिणी आहेत, आई आहे. आम्ही न्याय कुणाला मागायचा. जे कृत्य माझ्या वडिलांनी केलेल आहे त्याचा दोष कुटुंबाला देणं चुकीचं आहे.  सरकारला विनंती चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. चिमुरडीला इतक्या क्रूरतेने मारलं. हा माझा बाप नव्हताच असं मला म्हणावं वाटतंय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number