Pune BJP: पुणे भाजपची पहिली यादी तयार! 100 हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब; आज होणार अधिकृत घोषणा

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची 100 हून अधिक उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Pune BJP: पुणे भाजपची पहिली यादी तयार! 100 हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब; आज होणार अधिकृत घोषणा

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, सत्ताधारी महायुतीमध्ये 'पुणे कुणाचे?' यावरून पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाने आपली पहिली उमेदवारी यादी जवळपास निश्चित केली असून, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र, दुसरीकडे जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव निवळण्याऐवजी वाढत चालला आहे. भाजप आज 100 हून अधिक उमेदवारांची नावे असलेली पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात असून, या घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जागावाटपाच्या संघर्षात शिवसेनेचा शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पुण्यात वर्चस्व असलेल्या भाजपने 125 जागा जिंकण्याचा संकल्प केला असतानाच, शिवसेनेने किमान 35 ते 40 जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, भाजपने केवळ 15 जागांचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सन्मानाने जागावाटप व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत पुण्यातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे. महायुती टिकवण्यासाठी भाजप आपल्या प्रस्तावात सुधारणा करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: मुंबईत 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार पारा; रात्री गारवा तर दुपारी उकाडा; थंडी गायब होऊन पावसाची एन्ट्री?

भाजपच्या कोअर कमिटीची बुधवारी पुण्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 41 प्रभागांमधील प्रमुख उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. या यादीत 100 पेक्षा अधिक नावांचा समावेश असून, ती अंतिम मंजुरीसाठी मुंबईला पाठवण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबतांनंतर या नावांवर शिक्कामोर्तब झाले असून, आज दुपारी ही यादी प्रसिद्ध होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेची 25 ते 30 जागांची किमान अपेक्षा आहे, तर भाजप त्यांना 20 पेक्षा जास्त जागा देण्यास सध्या तयार नाही. पुण्यातील 35 जागांसाठी शिवसेना आग्रही राहिल्याने युतीमध्ये जागांचा तिढा सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर हा वाद लवकर मिटला नाही, तर काही जागांवर मित्रपक्षांमध्येच 'मैत्रीपूर्ण' लढत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पुणे महापालिकेची सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, विद्यमान नगरसेवकांसह नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे, शिंदे गट आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. महायुतीमधील या सुंदोपसुंदीचा फायदा विरोधकांना मिळू नये, यासाठी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते पडद्यामागे तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी 24 तास पुण्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा; केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता? पाहा ताजी अपडेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number