पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातून एका व्यक्तीला अटक केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना 25 वर्षीय तरुण अश्लील कॉल करत होता. या आरोपीचे नाव अमोल काळे आहे.

पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक

पुणे: महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातून एका व्यक्तीला अटक केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना 25 वर्षीय तरुण अश्लील कॉल करत होता. इतकंच नाही तर त्याने पंकजा मुंडेंना अनेक अश्लील मेसेजदेखील पाठवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण भोसरी येथील रहिवासी आहे. या आरोपीचे नाव अमोल काळे आहे. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण पंकजा मुंडे यांना वारंवार फोन कॉल व मेसेज करून त्रास देत होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर गुन्हे आणि महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा: सरकारनं पीओके ताब्यात घ्यावं; असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल 

तपासादरम्यान आरोपीला पडकण्यात यश:

या घटनेबद्दल माहिती देताना सायबर पोलीसचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, 'मुंबईतील नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करणारे निखिल भामरे यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून आरोपी अमोल काळे हा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेंना सतत कॉल व मेसेज करून त्रास देत होता. त्यानंतर भामरे यांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर आरोपी काळेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 78 आणि 79 व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

आरोपीने मान्य केला गुन्हा:

आरोपी अमोल काळे याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर त्याने ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता, तो ट्रेस करत पोलिसांनी त्याचे ठिकाण शोधून काढले. त्यादरम्यान हे स्पष्ट झाले की आरोपी पुण्यातील रहिवासी आहे. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी काळे याने गुन्हा मान्य करत, 'पंकजा मुंडेंना मीच कॉल करत होतो', अशी कबुली दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number