Pune Jain Boarding: बिल्डर विशाल गोखलेंचा मोठा निर्णय, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात येणार

पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबर केलेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखले यांनी घेतला आहे. जैन बोर्डिंगच्या जागेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Pune Jain Boarding: बिल्डर विशाल गोखलेंचा मोठा निर्णय, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात येणार

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबर केलेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखले यांनी घेतला आहे. जैन बोर्डिंगच्या जागेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील हा विषय उचलून धरला होता. रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग व्यवहारावरुन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते. 

'जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा व्यवहार रद्द' 
दरम्यान विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या ⁠जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखले यांनी ईमेलवरुन ट्र्स्टला कळवला असल्याची माहिती समोर आली आहे. या ⁠व्यवहारातून बाहेर पडण्याचा गोखले यांनी निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना ⁠नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखले यानी ईमेलद्वारे म्हटलं आहे. याव्यतिरिक्त ⁠जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असेही गोखले यांनी म्हटले आहे.  

⁠राजू शेट्टी यांनी केलेल्या आवाहनानंतर गोखले यांच्याकडून जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबत झालेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ⁠व्यवहार रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती राजू शेट्टी यांना कळवली असल्याची माहिती आहे. तसेच गोखले बिल्डर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात अर्ज देण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार? प्रताप सरनाईक यांनी दिले संकेत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 86 हून अधिक जैन संस्था, संघटनांची बैठक घेतली. त्या बैठकीत जैन बोर्डिंग विकण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला, तो बेकायदेशीर आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर असताना 60 वर्षांहून अधिक वर्ष सुरु असलेल्या वसतिगृहाची जागा विकणं ही लाजिरवाणी बाब आहे. हा व्यवहार ट्रस्टींनी रद्द करावा,अशी विनंती ट्रस्टींना करण्याचं त्याचबरोबर ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे त्या गोखले बिल्डर यांना विनंती करण्याचा ठराव झाला, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. 

पुढे बोलताना, गोखले बिल्डरला केलेल्या विनंतीनुसार त्यांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला आहे. जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही, या मालमत्तेवर गोखले बिल्डरचं नाव चढलेलं आहे. ते काढून जैन बोर्डिंगचं नाव लागत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही. व्यवहार पूर्णपणे रद्द झाला पाहिजे, सरकारनं पुढाकार घ्यावा, असं राजू शेट्टी म्हणाले.

रवींद्र धंगेकर आज जैन बोर्डिंगला भेट देणार 
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे आज जैन बोर्डिंगला भेट देणार आहेत. यावेळी ते जैन मुनींचे आशीर्वाद घेणार आहेत. रवींद्र धंगेकर यांनी 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच बिल्डर विशाल गोखलेंकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number