Amol Kolhe: वसुली दलालांच्या गुंडगिरीचा कहर; त्या मारहाणीच्या घटनेवरून खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केला संताप, पोस्ट शेअर करत मांडले मुद्दे

या घटनेवर खासदार अमोल कोल्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Amol Kolhe: वसुली दलालांच्या गुंडगिरीचा कहर; त्या मारहाणीच्या घटनेवरून खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केला संताप, पोस्ट शेअर करत मांडले मुद्दे

पुण्यातील हडपसर परिसरात कर्जवसुलीच्या नावाखाली एका व्यक्तीला भररस्त्यात घेरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, दोषींवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

या घटनेवर खासदार अमोल कोल्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, रिझर्व्ह बँकेने कर्जवसुलीबाबत स्पष्ट नियम घालून दिलेले आहेत, मात्र हडपसरमधील या घटनेत त्यांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे.

कोल्हे यांनी त्यांचे मत मांडताना लिहले आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वसुली एजंट कर्जदाराशी केवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच संपर्क साधू शकतात. तसेच कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. कर्जदाराची माहिती इतरांना देऊन बदनामी करणेही कायद्याने गुन्हा आहे. याशिवाय वसुलीसाठी येणाऱ्या एजंटांकडे अधिकृत ओळखपत्र आणि बँकेचे अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे.

हेही वाचा: Cold Hands Feet: ऐन उन्हाळ्यातही हात-पाय बर्फासारखे गार पडत असतील तर सावधान; असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका

सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे की, बँका गुंडांच्या जोरावर कर्जवसुली करू शकत नाहीत. जर एजंटांनी नियमांचे उल्लंघन केले, तर त्याची जबाबदारी संबंधित बँकेवरही येते. मात्र हडपसरमधील या घटनेत हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप होत आहे.

अमोल कोल्हे यांनी राज्याच्या गृहखात्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वसुली एजंटांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित बँकेची जबाबदारी निश्चित करून तिच्यावरही योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

एकूणच, खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा प्रकारच्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे. 

हेही वाचा: Crime News: भयंकर! जमिनीच्या वादातून आईसह दोन चिमुरड्यांना गळा आवळून संपवलं; तिहेरी हत्याकांडाने गावात खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number