Pune Election 2026: राजकारणात आता कागदही पचवावे लागतात; उमेदवारीसाठी चक्क प्रतिस्पर्ध्याचा ‘एबी’ फॉर्म गिळला, पुण्यात निवडणूक कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

पुण्यातील सहकारनगर-पद्मावती प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारी वादाने टोक गाठले. छाननीदरम्यान एका इच्छुकाने प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म हिसकावून गिळल्याने निवडणूक कार्यालयात खळबळ उडाली.

Pune Election 2026: राजकारणात आता कागदही पचवावे लागतात; उमेदवारीसाठी चक्क प्रतिस्पर्ध्याचा ‘एबी’ फॉर्म गिळला, पुण्यात निवडणूक कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

पुणे: राजकारणात उमेदवारी मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतींचा वापर होताना आपण अनेकदा पाहतो, पण पुण्यातील सहकारनगर-पद्मावती प्रभागात बुधवारी जे घडले, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेच्या दोन उमेदवारांमधील वाद इतक्या विकोपाला गेला की, एका इच्छुकाने चक्क आपल्याच पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 'एबी' फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरून हिसकावून घेतला आणि तो अक्षरशः गिळून टाकला! या फिल्मी स्टाईल प्रकारामुळे निवडणूक कार्यालयात एकच खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात या 'फॉर्म डाएट'ची जोरदार चर्चा रंगली आहे.

सहकारनगर-पद्मावती (प्रभाग 36 अ) या प्रभागातून शिवसेनेने दोन उमेदवारांना 'एबी' फॉर्म दिल्याने पेच निर्माण झाला होता. नियमानुसार, एकाच पक्षाचे दोन फॉर्म आल्यास पक्षाने अधिकृत पत्र देऊन एकाचे नाव निश्चित करणे गरजेचे असते, अन्यथा पहिला अर्ज वैध ठरतो.

याच तांत्रिक मुद्द्यावरून छाननी प्रक्रियेदरम्यान प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आपल्या हातातून उमेदवारी निसटतेय असे वाटताच, उद्धव कांबळे यांनी धक्कादायक पाऊल उचलत मच्छिंद्र ढवळे यांचा 'एबी' फॉर्म पळवला आणि तो नष्ट करण्याच्या उद्देशाने थेट गिळून टाकला.

हेही वाचा: New Mumbai Airport: कोट्यवधींचे विमानतळ, पण साधा कॉल लागेना; नवी मुंबई ऑनलाईन पेमेंटसाठी प्रवाशांची धावपळ, काय आहे कारण?

भर दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सरकारी कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याचा आणि कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी तातडीने उद्धव कांबळे यांना चौकशीसाथी ताब्यात घेतले.

कागद गिळला तरी तांत्रिक अडचण सुटली नाही; कारण निवडणूक नियमावलीनुसार कागदपत्रांची पडताळणी आधीच झाली होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कारवाईचे चक्र फिरवले.

या संपूर्ण नाट्यानंतरही मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. फॉर्म गिळला गेल्याने खळबळ उडाली असली, तरी प्रशासनाने त्या अर्जाची झेरॉक्स प्रत जोडून आणि नियमांचे पालन करून ढवळे यांची उमेदवारी निश्चित केली. उमेदवारी मिळवण्यासाठी थेट कागदच खाण्याचा हा प्रकार पुण्याच्या राजकीय इतिहासात 'अभूतपूर्व' मानला जात असून, या धक्कादायक प्रकारावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा: Beed Crime : बीड हादरलं! ऊसतोड मजुराच्या दोन चिमुकलींवर अत्याचार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number