Pune Election 2026 : ‘चौथ्या क्रमांकाच्या बटणाची लाइटच लागली नाही…’, पुण्यातील मतदान केंद्रावर गोंधळ, अंकुश काकडेंनी नोंदवला आक्षेप

विविध जिल्ह्यांतून गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Pune Election 2026 : ‘चौथ्या क्रमांकाच्या बटणाची लाइटच लागली नाही…’, पुण्यातील मतदान केंद्रावर गोंधळ, अंकुश काकडेंनी नोंदवला आक्षेप

पुण्यात ईव्हीएममधील तांत्रिक त्रुटी आणि पक्षांतर्गत बंडखोरीने नाट्यमय वळण घेतले आहे. तर मुंबई आणि नालासोपाऱ्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना विविध जिल्ह्यांतून गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासमोर विचित्र पेच निर्माण झाला आहे. या प्रभागात घड्याळ चिन्हाचे चार उमेदवार असताना तुतारी चिन्हावर दोन बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  पक्षाची अधिकृत उमेदवारी नसतानाही या उमेदवारांनी आपल्या प्रचारात ज्येष्ठ नेत्यांच्या फोटोंचा वापर केल्याचा दावा ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी केला आहे. या अनधिकृत वापरा विरोधात अंकुश काकडे यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अंकुश काकडे यांनी नोंदवला आक्षेप 
शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएमविरोधात आक्षेप नोंदवला आहे. अंकुश काकडे हे नुकतंच मतदानासाठी एका मतदान केंद्रावर गेले होते. मात्र त्यांनी तिथे असलेल्या मतदान यंत्राबाबत (EVM) गंभीर तक्रार दाखल आली आहे. मी चौथ्या क्रमांकाचे बटण दाबले, पण त्यावरील लाईट लागली नाही, असा दावा अंकुश काकडेंनी केला आहे. मी बटण दाबल्यानंतर त्यावरील लाईट लागली नाही. तुम्ही तिथे बसलेले आहात. मी इथे आहे. मी चौथं बटण दाबल्यानंतर लाईट लागलेला नाही. माझी तक्रार नोंदवून घ्या, असे अंकुश काकडे म्हणाले. याबद्दल त्यांनी तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत तक्रार नोंदवली जात नाही, तोपर्यंत मी हलणार नाही, असा आक्रमक पावित्रा अंकुश काकडे यांनी घेतला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number