सध्या राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यातील उरूळी गावातून आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्य संशयावरून पतीने पत्नीचा अमानुष छळ केला आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून पिडीतेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पतीने पत्नीसोबत जे कृत्य केले ते वाचून तुमचाही संताप होईल.
समोर आलेल्या माहितीनुसार, पिडीता ही 24 वर्षाची आहे. काही वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर तिला मुलीच होत होत्या. त्यामुळे तिला पती आणि सासरच्यांकडून छळ होत होता. अशातच पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. 20 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी पती दारूच्या नशेत धुंद होऊन घरी आला. त्याने घरात येताच पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते मला सांग, असे म्हणत त्याने तिला अश्लील शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – Bhiwandi Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! भावानेच दिली भावाची सुपारी; कामावर जात असताना…
मारहाण करताना मात्र त्याने विकृतीची परिसीमा ओलांडली. घरात असलेली अॅसिडची बाटली घेऊन आला आणि पत्नीच्या गुप्तांगावर ओतली. ॲसिड पडल्याने पीडित महिला वेदनेने विव्हळत जीवाच्या आकांताने ओरडू लागली. तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्या नराधमाने मुख्य दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर तिला पुन्हा घरातून जबर मारहाण केली.
हेही वाचा – Kalyan Crime: घरातच दिले जात होते घरफोडीचे धडे; जन्मदात्या बापानेच मुलांना बनवलं चोर, नेमकं प्रकरण काय?
हा प्रकार कोणाला समजू नये यासाठी पीडितेला कोणत्याही रुग्णालयात नेले नाही. तब्बल 15 दिवस खोलीत डांबून ठेवले. योग्य उपचारांभावी पीडितेच्या जखमा चिघळल्या. तिची प्रकृती अत्यंत खालावली. दरम्याने सर्व घडलेला प्रकार तिने आपल्या माहेरच्यांना सांगितला. माहेरच्या लोकांनी तातडीने उरुळी कांचन गाठून पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि ॲसिड हल्ल्याच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम पतीला बेड्या ठोकल्या.