Pune Election 2026: हातात बेड्या, तोंडावर स्कार्फ अन् पोलीस व्हॅनमधून ‘सिनेस्टाईल’ एन्ट्री; पुण्यात आंदेकर टोळीच्या म्होरक्याचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे महापालिका निवडणुकीत बंडू आंदेकर याने पोलिस व्हॅनमधून अर्ज भरत ‘सिनेस्टाईल’ एन्ट्री केली.

Pune Election 2026: हातात बेड्या, तोंडावर स्कार्फ अन् पोलीस व्हॅनमधून ‘सिनेस्टाईल’ एन्ट्री; पुण्यात आंदेकर टोळीच्या म्होरक्याचा उमेदवारी अर्ज दाखल

पुण्याच्या राजकारणात आज एका अशा दृश्याने सर्वांच्या नजरा वळवून घेतल्या, जे पाहून एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या क्लायमॅक्सची आठवण यावी. महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने पोलीस व्हॅनमधून थेट 'सिनेस्टाईल' एन्ट्री केली.

हाताला बेड्या, तोंडावर काळा स्कार्फ आणि सोबतीला पोलिसांचा कडेकोट पहारा अशा अवस्थेत बंडू आंदेकर निवडणूक कार्यालयात पोहोचला आणि पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

न्यायालयाच्या परवानगीने अर्ज भरण्यासाठी आलेल्या बंडू आंदेकरने पोलीस व्हॅनमधून उतरताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केवळ अर्ज भरून तो शांत बसला नाही, तर "बघा, मला लोकशाहीत कसं आणलंय!" असं म्हणत त्याने उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधले. "मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही," अशी घोषणा देत त्याने निवडणुकीच्या मैदानात आपण पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्याने "नेकी का काम, आंदेकर का नाम" अशा घोषणाही दिल्या.

हेही वाचा: Pune Election 2026: कुख्यात गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात, सत्ताधारी पक्षाकडून तिकीट; नव्या वादाला ठिणगी

विशेष म्हणजे, या निवडणुकीत आंदेकर कुटुंबाने आपली पूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली आहे. बंडू आंदेकरसह लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर अशा तिघांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आंदेकर कुटुंबाचा हा 'ट्रिपल अटॅक' पुण्यातील स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलणार की काय, अशा चर्चा आता होत आहेत.

या सर्व घडामोडींमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) भूमिकेची मोठी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी लक्ष्मी आणि बंडू आंदेकर यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक संकेत दिले होते.

आजच्या या हाय-व्होल्टेज ड्रामा आणि घोषणाबाजीनंतर, राष्ट्रवादीकडून बंडू आंदेकरला अधिकृत उमेदवारी मिळण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांचा हा मिलाफ आता आगामी निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हेही वाचा: PMC Election 2026: पुण्यात मनसेचा 'या' पक्षासोबत निवडणूक लढण्यास नकार; महाविकास आघाडीच्या बैठकीकडे फिरवली पाठ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number