पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. पुणे जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार पिछाडीवर पडले आहे. पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ होच असल्याचे चित्र आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर, पुरंदर विधानसभा मतदारसंघात संजय जगताप आणि भोर विधानसभा मतदारसंघात संग्राम थोपटे पराभवाच्या छायेत आहेत. भोर तालुक्यात थोपटे यांच्या बालेकिल्ल्याला अजित पवारांनी सुरुंग लावला आहे.
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे आघाडीवर आहेत आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप 22 हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपाचे हेमंत रासने आघाडीवर आहेत आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर बारा हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर आघाडीवर आहेत आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे 45 हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत.
विधानसभा निवडणुकीत मविआ 50 जागांवर आघाडीवर आहे. यात काँग्रेस आणि ठाकरे सेना प्रत्येकी 19 जागांवर तर पवारांची राष्ट्रवादी बारा जागांवर आघाडीवर आहे.