पुलवामामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

  जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. नगरसेवक राकेश पंडिता हे त्राल येथे आपल्या आपले शेजारी मुश्ताक अहमद यांच्या घरी असताना दहशतवादी घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात राकेश पंडिता यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर गोळीबारात शेजाऱ्याची मुलगी आसिफा मुश्ताक नावाची एक महिला जखमी झाली आहे. […]

पुलवामामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

 

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. नगरसेवक राकेश पंडिता हे त्राल येथे आपल्या आपले शेजारी मुश्ताक अहमद यांच्या घरी असताना दहशतवादी घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात राकेश पंडिता यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर गोळीबारात शेजाऱ्याची मुलगी आसिफा मुश्ताक नावाची एक महिला जखमी झाली आहे. महिलेवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे. राकेश पंडिता यांना सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा अधिकारी पुरवण्यात आले होते. तसंच त्यांना श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र त्राल येथे जाताना ते सुरक्षा सोबत घेऊन गेले नव्हते.

काश्मीर पोलिसांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. तसेच या घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.घटनेतर पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाकडून निवेदन प्रसिद्ध करत शोक व्यक्त करण्यात आला आहे. ‘राकेश पंडिता यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्द्दल ऐकून दु:ख वाटलं. या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. अशा प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत’, असं त्यांनी निवेदनामध्ये म्हटलं आहे.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number