…म्हणून शहरी भागात भारनियमन करा, राष्ट्रवादीच्या आमदार अहिंरेची मागणी

नाशिक, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात ग्रामीण भागाला विजेचा पुरवठा करण्यासाठी शहरी भागात काही तासांचे भारनियमन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी केली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्याकडे आमदार सरोज अहिरे यांनी ही मागणी केली आहे. या मागणीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कोण आहेत आमदार सरोज अहिरे ? नाशिक […]

…म्हणून शहरी भागात भारनियमन करा, राष्ट्रवादीच्या आमदार अहिंरेची मागणी

नाशिक, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात ग्रामीण भागाला विजेचा पुरवठा करण्यासाठी शहरी भागात काही तासांचे भारनियमन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी केली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्याकडे आमदार सरोज अहिरे यांनी ही मागणी केली आहे. या मागणीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

कोण आहेत आमदार सरोज अहिरे ?

नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत. अजित पवार समर्थक आमदारांमध्ये त्यांचा समावेश होतो. काही महिन्यांपूर्वी ४ महिन्यांच्या बाळाला घेऊन विधानसभेत आल्यामुळे आमदार सरोज अहिरे चर्चेत आल्या होत्या. विधीमंडळात स्तनदा मातांसाठी विशेष कक्षाची व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. आता आमदार सरोज अहिरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ग्रामीण भागाला विजेचा पुरवठा करण्यासाठी शहरी भागात भारनियमन करा, अशी मागणी आमदार सरोज अहिरे यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number