पंतप्रधानांचा जपान दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 आणि 24 मे असे दोन दिवसांच्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फूमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान एंथनी अल्बानीस यांची भेट घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ मे रोजी क्वाड देशांची बैठकित सहभागी होतील. जपानमध्ये क्वाड देशांच्या प्रमुखांची चौथी बैठक होत आहे. क्वाड देशांच्या या […]

पंतप्रधानांचा जपान दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 आणि 24 मे असे दोन दिवसांच्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फूमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान एंथनी अल्बानीस यांची भेट घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ मे रोजी क्वाड देशांची बैठकित सहभागी होतील. जपानमध्ये क्वाड देशांच्या प्रमुखांची चौथी बैठक होत आहे. क्वाड देशांच्या या अधिवेशनात हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरातील घडामोडी, समकालीन जागतिक प्रश्न, सदस्य राष्ट्रांचे हितसंबंध यासंबंधी चर्चा होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिनंदम बागची यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं  स्वागत करताना एका जपानी मुलाने हिंदीत भाषण केले. जपानी मुलागा हिंदी मध्ये बोलताना पंतप्रधानांनी ऐकले तेव्हा ते थक्कच झाले. यावर पीएम मोदींनी या मुलाला विचारले, वाह! तुम्ही हिंदी कुठून शिकलात? तुम्ही तर हिंदी फार छान बोलता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जपानी मुलाशी केलेल्या संवादाचा व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान क्वाड संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून त्यांनी टोकियोला भेट दिली आहे. सदस्य देशांमधील सहकार्याला चालना देणे आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा करणे, हे क्वाडचे उद्दिष्ट आहे. पीएम मोदींशी संवाद साधणारी मुलं खूपच उत्साही दिसत होती. यावेळी मुलांनी पीएम मोदींचा ऑटोग्राफही घेतला आहे. यासोबतच अनिवासी भारतीयांनीही पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ‘भारत का शेर’ म्हणजे ‘भारताचा सिंह’चा नारा दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number