बलिप्रतिपदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाच्या चरणी

  बलिप्रतिपदेचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी लीन झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा केदारनाथच्या दर्शनासाठी पोहचले आहेत. केदारनाथ दौऱ्यात पंतप्रधानांनी केदारनाथमधील आदिगुरू शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. तसेच पावणे चारशे कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन त्यांनी केले आणि त्यांची पायाभरणी केली. यामध्ये मंदाकिनीवरील पूल आणि तीर्थक्षेत्रावरील पुजाऱ्यांसाठी निवासस्थाने, सरस्वती आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावरील सुरक्षा भिंती, […]

बलिप्रतिपदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाच्या चरणी

  बलिप्रतिपदेचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी लीन झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा केदारनाथच्या दर्शनासाठी पोहचले आहेत. केदारनाथ दौऱ्यात पंतप्रधानांनी केदारनाथमधील आदिगुरू शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. तसेच पावणे चारशे कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन त्यांनी केले आणि त्यांची पायाभरणी केली. यामध्ये मंदाकिनीवरील पूल आणि तीर्थक्षेत्रावरील पुजाऱ्यांसाठी निवासस्थाने, सरस्वती आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावरील सुरक्षा भिंती, केदारनाथ धाममध्ये करण्यात आलेल्या चार गुहांचा समावेश आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी केदारनाथचे नुकसान झाले होते. केदारनाथचे नुकसान पाहून केदारनाथ पुन्हा उभे राहिल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र केदारनाथ पुन्हा एकदा उभे राहिल असे माझे मन सांगत होतं. आणि तसेच झाले. ईश्वराच्या कृपेने केदारनाथचे विकासकार्य पूर्णत्वास गेले आहे. असे ते म्हणाले. तसेच केदारनाथ देवाच्या चरणी लीन व्हायला आलो आहे, असे म्हणत त्यांनी केदारनाथचा रुद्राभिषेक आणि आरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number