राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारचं कौतुक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या अभिभाषणात त्यांनी येणाऱ्या दशकात भारताला नव्या ऊर्जेने गतिमान करण्याचे विचार मांडले. अनेक क्षेत्रात भारताने प्रगती करून पाच वर्षांत रँकिंग सुधारलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच अनेक सरकारी निर्णयांचं त्यांनी कौतुकही केलंय. तसंच सरकारी योजनांबद्दलही शासनाची स्तुती केली. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करणं (Article 370 […]

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारचं कौतुक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या अभिभाषणात त्यांनी येणाऱ्या दशकात भारताला नव्या ऊर्जेने गतिमान करण्याचे विचार मांडले. अनेक क्षेत्रात भारताने प्रगती करून पाच वर्षांत रँकिंग सुधारलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच अनेक सरकारी निर्णयांचं त्यांनी कौतुकही केलंय. तसंच सरकारी योजनांबद्दलही शासनाची स्तुती केली.

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करणं (Article 370 abolished) , तिहेरी तलाख (Triple Talaq), राम मंदिर यांसारख्या शासन निर्णयांचा राष्ट्रपतींनी उल्लेख केलाय. लडाखमधील नागरिकांचंही त्यांनी अभिनंदन केलं. चर्चा, वाद या लोकशाहीला बळकट करतात असं मत त्यांनी मांडलं. कोणतीही हिंसा देशाला दुबळं बनवते, असंही त्यांनी अभिभाषणात म्हटलं.

मार्च 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काश्मिरमध्ये सुमारे 3500 घरं बांधण्यात आली. 2 वर्षांत 24000 पेक्षा जास्त घरं पूर्ण झाली. 8 कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन मिळालं. 24 कोटी लोकांना विमा सुरक्षा मिळाली, असं आपल्या अभिभाषणात त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number