Prateek Yadav Death: अखिलेश यादव यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर! लहान भाऊ प्रतीक यादव यांचं अवघ्या 38व्या वर्षी निधन

उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून बुधवारी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली

Prateek Yadav Death: अखिलेश यादव यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर! लहान भाऊ प्रतीक यादव यांचं अवघ्या 38व्या वर्षी निधन

उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून बुधवारी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली. समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे धाकटे पुत्र प्रतीक यादव यांचे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने यादव कुटुंबासह उत्तर प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

प्रतीक यादव हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती होते. बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांची टीम त्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. त्यानंतर त्यांना तातडीने लखनऊ येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पहाटेच्या सुमारास त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं होतं. या अचानक घडलेल्या घटनेमुळे यादव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad: …अन् जितेंद्र आव्हाडांची थेट घोड्यावरूनच महापालिकेत एन्ट्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनांचा नोंदवला निषेध

राजकारणापासून दूर राहून व्यवसायात सक्रिय

देशातील प्रभावशाली राजकीय घराण्यातील सदस्य असूनही प्रतीक यादव यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले होते. त्यांनी व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेषतः फिटनेस आणि रिअल इस्टेट क्षेत्रात ते कार्यरत होते. प्रतीक यादव यांनी युनायटेड किंगडममधील लीड्स विद्यापीठात शिक्षण घेतले होते. लखनऊमध्ये त्यांनी “द फिटनेस प्लॅनेट” नावाने जिम सुरू केली होती. फिटनेस क्षेत्रातील उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. स्थानिक व्यावसायिक वर्तुळातही ते परिचित चेहरा मानले जात होते.

प्राणीप्रेमासाठीही ओळख

व्यवसायासोबतच प्रतीक यादव हे प्राणीप्रेमासाठीही ओळखले जात होते. त्यांनी “जीव आश्रय” नावाची संस्था सुरू केली होती. ही संस्था भटक्या कुत्र्यांच्या बचाव, उपचार आणि देखभालीसाठी काम करत होती. समाजकार्यातील या योगदानामुळे अनेकांकडून त्यांचं कौतुक होत असे.

हेही वाचा: Sunil Tatkare Meets Sharad Pawar: मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

2011 मध्ये अपर्णा यादव यांच्याशी विवाह

प्रतीक यादव यांनी 2011 मध्ये अपर्णा बिष्ट यांच्याशी विवाह केला होता. विवाहानंतर अपर्णा यादव या राजकारणात सक्रिय झाल्या आणि नंतर भाजपमध्ये दाखल झाल्या. या दाम्पत्याला एक मुलगी आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number