इंधन दरवाढीचा फटका महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना बसत असतानाच आता एसटी तिकीटाचे दर वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीचे दर वाढण्याची संकेत दिले आहेत. इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला 310 कोटीच्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे एसटीच्या तिकिटाच्या दरामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता सरनाईक यांनी वर्तावली.
जर इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर एसटीच्या तिकीटाचे दर देखील वाढू शकतात. लाल परीचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. एसटी महामंडळातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याकारणांमुळे पुढील महिन्यात एसटी कर्मचारी, अधिकारी यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्रस्ताव आल्यानंतर आतापर्यंत एसटीची दरवाढ झाली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात एसटीच्या तिकिटामध्ये दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यावेळ माध्यमांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “तीन वेळा डिझेलची झालेली दरवाढ, इतर वस्तूंमध्ये झालेली वाढ, 310 कोटीचा डिझेल वाढीमुळे वार्षिक फटका सहन करावा लागत आहे. सुटे भागात झालेली वाढ या कारणांमुळे आजच्या तारखेला सगळ मिळून 410 कोटी नुकसान एसटी महामंडळाला होत आहे. अनेक प्रश्न मार्गी लागले नाही त्यामुळे कामगारांनी आंदोलनाचे इशारे दिले आहेत. त्यामुळे पुढल्या आठवड्यात कामगारांबरोबर बैठक घेणार आहे. दरम्यान एसटी तिकिटांच्या दरात आजपर्यंत दरवाढ झालेली नाही पण अशा प्रकारे सातत्याने जर इंधनाच्या दरात वाढ होत राहिली तर भविष्यात विचार करावा लागेल. तर अद्यापपर्यंत रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव नाही.” अशा माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाीक यांनी दिली.