नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सर्वपक्ष मुंबई पालिका निवडणुक आणि राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. या सर्व निवडणुकीत पुणे, पिंपरी चिचवड महापालिकांची निवडणूक राज्याच्या केंद्रस्थानी आलेली आहे. मुंबई पालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधुंच्या युतीनंतर 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. या चर्चांनंतर दोन्ही गटात पडद्यामागच्या हालचालींना वेग लागला. असं असताना अजित पवारांसोबत होणाऱ्या युतीवर शदर पवार यांच्या राष्ट्रवादीतून नाराजी व्यक्त केली जात होती. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अचानक पक्षाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. प्रशांत जगताप यांनी 26 वर्ष पक्षात काम केले असून ते पुणे शहराचे शहराध्यक्ष होते. त्यामुळे ऐन महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर प्रशांत जगताप यांचा राजीनामा शरद पवार गटासाठी मोठा अडथळा निर्माण करु शकतो.
जय महाराष्ट्रच्या वेबसाईटवर बातमीची सविस्तर माहिती अपडेट केली जात आहे….