‘शासनाच्या बेजबाबदारपणामुळेच नाशिक दुर्घटना’

नाशिकमधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीरहुसेन रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला, त्याबद्दल प्रकाश आंबेडकर बोलत होते. ऑक्सिजन पुरवठा करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत सर्व कामे खासगी […]

‘शासनाच्या बेजबाबदारपणामुळेच नाशिक दुर्घटना’

नाशिकमधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे
अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीरहुसेन रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला, त्याबद्दल प्रकाश आंबेडकर बोलत होते.

ऑक्सिजन पुरवठा करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत सर्व कामे खासगी ठेकेदारांना देण्यात आली असल्याची माहिती डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी दिली. टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरत असताना वॉल बंद करण्यात आला होता तो बंदच राहिला. त्यामुळे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना
ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
हा मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर शासन कारवाई करेल, अशी अपेक्षा ही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number