‘एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेल एवढा संप ताणू नये’ – प्रकाश आंबेडकर

   एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना तुटेल एवढा संप ताण नये, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.   राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना एसटीचे खासगीकरण हवे आहे त्यामुळे सावधान रहा असा इशारा आंबेडकरांनी दिला  आहे. सरकार कोणतेही असो भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस […]

‘एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेल एवढा संप ताणू नये’ – प्रकाश आंबेडकर

   एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना तुटेल एवढा संप ताण नये, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

  राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना एसटीचे खासगीकरण हवे आहे त्यामुळे सावधान रहा असा इशारा आंबेडकरांनी दिला  आहे. सरकार कोणतेही असो भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस या सर्व पक्षआंना एसटीचे खासगीकरण हवे आहे. एसटीचे विलिनीकरणाबाबत सर्व पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ती संधी एसटी कर्मचाऱ्यांनी मिळू देता कामा नये, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

  याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एसटी संपाबाबत काही सूचना केल्या असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. फडणवीसांनी सांगितलेल्या सूचनांना आम्ही गांभीर्याने घेतले असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number