सध्या दबाव तंत्राचा वापर सरकार करतंय पण हे सरकार प्याद आहे. या मागे RSS आहे हे प्यादे कधीही मोडले जातील. या दबाव तंत्राला घाबरत नाही मी स्वतंत्र भारतात जन्मलेलो आहे आणि माझ्या मागे एक वलय आहे. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच आघाडी सोबत जाण्याचा निर्णय 31 ऑगस्टला घेणार असंही ते म्हणाले आहेत.
एक हिंदू दुसऱ्या हिंदू वर अत्याचार करणार असं साध्याच वातावरण आहे मागास वर्ग हा हिंदू ही आहे. उद्या वंचित बहुजन आघाडीचे सरकार आलं तर पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं जाईल. क्रिमिलियरचा ही मुद्दा कायद्याने सोडवू असं आंबेडकर म्हणाले आहेत.
एसटीचा वर्ग हा आर्थिक संकटात आहे. ओबीसीसाठी शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र बजेट असण्याची मागणीचाही उल्लेख त्यांनी केला आहे. आघाडी सोबत जाण्याचा निर्णय 31 ऑगस्टला घेणार असल्याचं ते म्हणाले आहे.
राज्य सहकारी बँकेचे प्रकरण 2 जी सक्याम सारख होऊ नये ही अपेक्षा ज्या प्रमाणे त्या प्रकरणात सरकारने पुरावे सादर केले नाही आणि कोर्टाला याची वाट पाहावी लागली असं होऊ नये. विरोधी पक्ष संपवण्याचे राजकारण हे सरकार करते आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.