हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाला अटक; कोण आहे प्रफुल्ल लोढा?

  नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात 72 अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत पोहोचलेले आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रफुल्ल लोढाविरोधात मुंबईत पोक्सो बलात्कारसह हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून प्रफुल्ल लोढाला अटक देखील करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा याला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जळगाव […]

हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाला अटक; कोण आहे प्रफुल्ल लोढा?

 

नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात 72 अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत पोहोचलेले आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रफुल्ल लोढाविरोधात मुंबईत पोक्सो बलात्कारसह हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून प्रफुल्ल लोढाला अटक देखील करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा याला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जळगाव जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा याच्या मालमत्तेवर पोलिसांनी छापेमारी केली असून तपासणी दरम्यान लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांनी जप्त केली आहेत.

प्रफुल्ल लोढा भाजपाचा माजी पदाधिकारी आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे. मंत्री महाजनांवर लोढाने गंभीर आरोप केले. त्यानंतर लोढाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. वंचित बहुजन आघाडीसोबतही काम केलं आहे. सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक अशी प्रफुल्ल लोढाची ओळख आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number