NCP Melava Gondia : पटेलांचं तटकरेंच्या पावलावर पाऊल, मेळाव्याच्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब

प्रफुल पटेलांच्या कार्यकर्ता मेळाव्यातून अजितदादांचा फोटो गायब, पत्रकारांच्या प्रश्नाला पटेलांचं नो कमेंट

NCP Melava Gondia : पटेलांचं तटकरेंच्या पावलावर पाऊल, मेळाव्याच्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब

Gondia : उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. काही दिवसातच पक्षात अंतर्गत कलह समोर येण्यास सुरुवात झाली होती. दादांच्या अपघातानंतर तीनच दिवसात सुनेत्रा पवारांचा शपथविधी तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा पक्षात वाढता हस्तक्षेप त्यामुळे पक्षात दोन गट निर्माण होण्याचे चिन्ह निर्माण झाले होते. अनेक जिल्ह्यात पक्षाचे मोठे नेते बैठका घेत असत. प्रामुख्याने तटकरे आणि प्रफुल पटेल जिल्ह्याचा दौरा करून पक्षाच्या मोर्चेबांधणीवर लक्ष देत आहेत.

त्यातच रायगडमध्ये तटकरेंनी घेतलेल्या एका बैठकीच्या प्रसंगी बॅनरवरून दादांचा फोटो गायब होता. तेव्हा राज्यात मोठ्या प्रमाणावर गोधळ निर्माण झालं होता, शरद पवारांच्या राष्ट्र्वादीने देखील दादांच्या पक्षावर जोरदार टीका केली होती.

नेमकं प्रकरण घडलं तरी काय ?

गोंदिया येथील तिरोडा शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा पार पडला. सभेमध्ये बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नव्हता. त्यामुळे चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले. अजित पवारांचा फोटो नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात होते. विशेष मध्ये त्या बॅनरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो लागलेला होता.

हेही वाचा : Rahuri Byelection : राहुरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! 'तालुक्याच्या अस्मितेसाठी लढणार'; ठाकरेंच्या निष्ठावान नेत्याची बंडखोरी

राष्ट्रवादीत नक्की चाललंय काय?

काही दिवसाआधी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये दादांच्या मृत्यूनंतर आयोगासोबत केलेले सर्व कागदपत्र कार्याध्यक्षांकडे अध्यक्षासारखे अधिकार देण्याचा बदल वादाचा मुद्दा ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षात तटकरे आणि प्रफुल पटेल प्रचंड नाराज झाले होते, असं सूत्रांच्या अहवालाने समजले होते. परंतू, काही दिवसानंतर सुनेत्रा पवारांनी पत्र मागे घेतले होते.

प्रफुल पटेल या घटनेबाबत काय म्हणाले?

राष्ट्रवादीच्या होणाऱ्या मेळाव्याला दादांचा फोटो गायब हे दुसऱ्यांदा झाले आहे. त्यात प्रफुल पटेल त्या मेळाव्याला मुख्य नेते असल्यामुळे दादांचा फोटो गायब ही मोठी बाब होती. मेळाव्यानंतर जेव्हा प्रफुल पटेलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा पटेलांनी 'आता राहू द्या सगळं हे…', असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number