तीन महिने वीजतोडणी थांबवण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा

वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत होणार असल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांची वीजतोडणी तीन महिने थांबवणार असल्याचेही नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाच्या आक्रमक भूमिकेनंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजतोडणी तात्पुरती थांबवली असल्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती पीक येईपर्यंत वीज तोडणी तीन महिने […]

तीन महिने वीजतोडणी थांबवण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा

वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत होणार असल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांची वीजतोडणी तीन महिने थांबवणार असल्याचेही नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपाच्या आक्रमक भूमिकेनंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजतोडणी तात्पुरती थांबवली असल्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती पीक येईपर्यंत वीज तोडणी तीन महिने तात्पुरती थांबवली असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. तसेच वीजतोडणी केलेल्या शेतकऱ्यांची वीज पुरवठासुद्धा पुर्ववत केला जाणार असल्याचे नितीन राऊत यांनी सभागृहात सांगितले आहे.

सभागृहात विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून सरकारवर हल्लाबोल करत शेतकऱ्यांचे वीजबील माफ करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आज उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या वीजबीलबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची वीजतोडणी तीन महिने थांबणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number