रोहित पवारांच्या पोस्टनंतर राजकीय वादंग; काय आहे पोस्ट?

रोहित पवार यांनी केलेल्या ट्विट पोस्ट केली आहे.

रोहित पवारांच्या पोस्टनंतर राजकीय वादंग; काय आहे पोस्ट?

बीड : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे. देशमुखांची निघृण हत्या केल्याप्रकरणी चौकशी वेग आला आहे. सीआयडी आणि एसआयटी आरोपींचा शोध घेत आहेत. अशातच पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विट पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बीडमधील पोलीस ठाण्यात पाच नवे पलंग आजच कसे मागवले असा प्रश्न उपस्थित केला आहे.   

काय आहे रोहित पवारांची पोस्ट?

#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.

नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा.

रोहित पवार यांच्या पोस्टनंतर नवीन वादंग पेटले आहे. पोलीस ठाण्यात पाच नवीन पलंग मागवले आहेत. आता पंखा, एसी देखील मागवा असा उपहासात्मक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

बीडमध्ये सरपंचाची हत्या झाल्याप्रकरणी चौकशीला वेग आला आहे. नुकतच वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आला आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली जात आहे आणि दुसऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. बीडच्या पोलिस ठाण्यात नवीन पलंग का मागवले अशा प्रश्न उपस्थित होत आहे. वाल्मिक कराडला पोलिसांनी घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात नविन पलंग मागवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number