हलक्या प्रतीचं मद्य विदेशी बाटल्यात भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हलक्या प्रतीचं महाराष्ट्रातील मद्य उच्च प्रतीच्या बाटलीत भरून विक्री करणाऱ्या टोळीचा पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पर्दाफाश केलाय. वसई तालुक्यातील वालीव येथे सदर टोळी महाराष्ट्रातील ब्लेंडर्स , रॉयल स्टॅग , रॉयल चॅलेंज हे 600 रुपयांपर्यंत मिळणारं मद्य विदेशी रेड लेबल, ब्लॅक लेबल अशा उच्च प्रतीच्या लेबल असलेल्या बाटल्यांमध्ये भरून तब्बल 4 ते 25 हजारपर्यंत अवैधरीत्या […]

हलक्या प्रतीचं मद्य विदेशी बाटल्यात भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हलक्या प्रतीचं महाराष्ट्रातील मद्य उच्च प्रतीच्या बाटलीत भरून विक्री करणाऱ्या टोळीचा पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पर्दाफाश केलाय.

वसई तालुक्यातील वालीव येथे सदर टोळी महाराष्ट्रातील ब्लेंडर्स , रॉयल स्टॅग , रॉयल चॅलेंज हे 600 रुपयांपर्यंत मिळणारं मद्य विदेशी रेड लेबल, ब्लॅक लेबल अशा उच्च प्रतीच्या लेबल असलेल्या बाटल्यांमध्ये भरून तब्बल 4 ते 25 हजारपर्यंत अवैधरीत्या विकत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. 

त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वसई तालुक्यातील वालीव येथे धाड टाकत महाराष्ट्रातील हलक्या प्रतीचं मद्य तसंच विदेशी रिकाम्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतलं असून यामागे पालघर, ठाणे जिल्ह्यात मोठी टोळी सक्रीय असल्याचा संशय ही व्यक्त करण्यात येतेय.

येत्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपींनी शासन परवानगी असलेल्या दुकानातूनच मद्य खरेदी करावं असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number