पोहरादेवीत पोलिसांची पाण्यासाठी वणवण

बंजारा काशी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या पोलिसांना पिण्याच्या पाण्याची मोठी कसरत करावी लागली.

पोहरादेवीत पोलिसांची पाण्यासाठी वणवण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहरादेवी दौऱ्यासाठी आयोजित केलेल्या मोठ्या पोलिस बंदोबस्तात अडचणी वाढत आहेत. बंजारा काशी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या पोलिसांना पिण्याच्या पाण्याची मोठी कसरत करावी लागली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत एक व्हिडिओ ट्विट केला असून, पोलिसांच्या हाल अपेष्टांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. 

“पोलिसांना पिण्याच्या पाण्यासाठी किती हाल करावे लागतात” असा प्रश्न उपस्थित करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. जय महाराष्ट्रने या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असून, स्थानिक स्तरावर आढावा घेतला असून या घटनेने पोलीस दलाच्या सुविधांविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number