PM Narendra Modi : भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना 125 व्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदीं यांनी वाहिली आदरांजली

आज 14 नोव्हेंबर, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती.

PM Narendra Modi : भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना 125 व्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदीं यांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : आज 14 नोव्हेंबर, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 125 वी जयंती. त्यामुळे हा दिवस देशभरात ‘बालदिन’ म्हणून उत्साहात साजरा होतो. पंडित नेहरू हे लहान मुलांवरील त्यांच्या अफाट प्रेमासाठी प्रसिद्ध होते. याच पार्श्वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहताना म्हटलं की, “माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन” त्यांच्या या पोस्टवर नेटिझन्स आदरपूर्वक कमेंट पडत आहेत. 

नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला आणि 27 मे 1964 रोजी ते निधन पावले. जवाहरलाल नेहरूंना लहान मुलांबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी होती. ते लहान मुलांना देशाचं भविष्य मानायचे. त्यांच्या या प्रेमापोटी मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणू लागले. कोणत्याही राष्ट्राच्या मुलांना आणि तरुणांना उच्च शिक्षण, योग्य दिशा आणि संधी प्रदान करणे त्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे जवाहरलाल नेहरू यांच उद्दिष्ट होते. 

हेही वाचा : Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये NDA पुढे; केला 150 चा टप्पा पार, BJP – JDU ने वाढवलं टेन्शन

त्याचसोबत पंडित नेहरू हे केवळ एक राजकारणी नव्हते तर ते एक प्रतिभाशाली लेखक आणि कवी देखील होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आहे. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस मुलांना आणि चाचा नेहरूंना समर्पित आहे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त आणि बालदिनानिमित्त देशभरातील शाळांमध्ये मुलांना भेटवस्तू आणि बक्षिसे दिली जातात. त्याचसोबत वेशभूषा, भाषण, नृत्य, खेळ, वादविवाद अशा अनेक स्पर्धा घेतल्या जातात. दरम्यान वेगवेगळ्या देशांमध्ये बालदिन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ देखील २० नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number