PM Narendra Modi : मोदींची पंतप्रधानपदी 12 वर्ष पूर्ण! इटलीहून जॉर्जिया मेलोनी यांची खास पोस्ट चर्चेत; म्हणाल्या, "नरेंद्र मोदी हार्दिक शुभेच्छा!"

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कारकीर्दीला 12 वर्ष झाली असून यानिमित्त इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi : मोदींची पंतप्रधानपदी 12 वर्ष पूर्ण! इटलीहून जॉर्जिया मेलोनी यांची खास पोस्ट चर्चेत; म्हणाल्या, &quotनरेंद्र मोदी हार्दिक शुभेच्छा!&quot

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कारकीर्दीला 12 वर्ष झाली असून सर्वाधिक काळ देशाची सेवा करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री कार्यकाळास 12 वर्ष पूर्ण झाली.देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4397 दिवस प्रधानमंत्री राहण्याचा विक्रम यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढला असून, यानिमित्त देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेचे बळ लाभावे, यासाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती बनल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेकॉर्ड केला आहे. यानिमित्त इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- TMC Congress Merger: राष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप; काँग्रेसमध्ये TMC विलीनीकरणाच्या हालचाली सुरू? सोनिया गांधींचा ममता बॅनर्जींना फोन

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत, यावेळी त्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, “अभिनंदन, नरेंद्र मोदी जे आज भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित पंतप्रधान बनले आहेत. गेल्या काही आठवड्यांत रोममध्ये पुन्हा भेटून आणि आपल्या राष्ट्रांसाठी व आपल्या लोकांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने भविष्याकडे पाहणाऱ्या एका विशेष सामरिक भागीदारीचा एकत्रितपणे शुभारंभ करून आनंद झाला. त्यामुळे आपल्या देशांना, जनतेला नवीन संधी निर्माण होणार आहेत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून सत्तेवर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014, 2019 आणि 2024 साली लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या. माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 वर्षापेक्षा जास्त काळ पंतप्रधानपद भूषवलं. पण त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता. तसेच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 1952 पासूनच्या कार्यकाळाला आधार मानण्यात आलय. कारण देशात लोकसभा निवडणुका होण्याआधी 1947 ते 1952 पर्यंत ते अंतरिम सरकारचे प्रमुख होते. दरम्यान 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून 12 वर्ष पूर्ण झाली. त्याचसोबत मोदी देशाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान बनले आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number