पंतप्रधान मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचललेल्या योग्य पावलांबद्दलही विचारपूस केली.

पंतप्रधान मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यादरम्यान, त्यांनी सीमावर्ती राज्य म्हणून गुजरातची तयारी आणि सीमा तणावाच्या सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारच्या आगाऊ नियोजनाचा आढावा घेतला आणि या संदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी, विशेषतः पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कच्छ, बनासकांठा, पाटण, जामनगर सारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये उचललेल्या योग्य पावलांबद्दलही विचारपूस केली.

7 तासांहून अधिक वेळेपर्यंत चालला ब्लॅकआऊट:

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कच्छ आणि बनासकांठा किंवा गुजरातच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील अनेक भाग गुरुवारी रात्री सात तासांहून अधिक काळ वीजेशिवाय राहिले. कच्छ आणि बनासकांठा हे दोन्ही जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. पाकिस्तानच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भूज, नलिया, नख्तराणा आणि गांधीधाम शहरांसह कच्छच्या अनेक भागांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे'.

ड्रोन आणि मिसाईल रोखण्यात यश:

संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, '7-8 मेच्या मध्यरात्री भारतीय सशस्त्र दलांनी उत्तर आणि पश्चिम भारतातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून पाकिस्तानने सोडलेले सर्व ड्रोन आणि मिसाईल यशस्वीरित्या रोखण्यात आले'.

अवंतीपोरा ते भुज पर्यंत पसरलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांना अत्याधुनिक अँटी-यूएव्ही आणि मिसाईल संरक्षण प्रणाली वापरून प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले. यामुळे, भारतीय भूमीवर कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही याची खात्री झाली. वृत्तानुसार, भारताने त्यांच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीने सर्व ड्रोन आणि मिसाईल निष्क्रिय केली. त्याचप्रमाणे, बनासकांठा जिल्ह्याच्या सुईगम आणि त्याच्या आसपासच्या 20 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यासह, गुरुवारी भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या गुजरात येथील कच्छ जिल्ह्यातील खावडा गावाजवळ 'ड्रोनसारख्या' वस्तूचे अवशेष आढळले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number