PM Kisan Yojana:देशभरातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 21 वा हप्ता आज देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यंदाच्या हप्त्याचा लाभ तब्बल 9 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी मंत्रालयाने याबाबत काही दिवसांपूर्वीच अधिकृत माहिती दिली होती. आज दुपारी 2 वाजल्यानंतर हप्ते जमा होण्यास सुरुवात होईल, अशीही माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात आज 2000 रुपयांचा भरणा
पीएम किसान योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. एका वर्षात शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये दिले जातात. आज येणारा 21 वा हप्ता सरकारकडून वेळेत वितरीत केला जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा मेसेज मोबाईलवर येईल, तर काहींना बँक एंट्रीद्वारे हा हप्ता मिळाल्याची खात्री करावी लागेल.
केवायसी नसेल तर हप्ता थांबू शकतो
योजनेतील सर्वाधिक महत्त्वाची अट म्हणजे EKYC. सरकारने गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांची पडताळणी सुरू केली होती. यामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये चुका आढळून आल्या आहेत. ज्यांनी अजूनही e-KYC पूर्ण केलेली नाही, अशा शेतकऱ्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे अजूनही केवायसी बाकी असेल तर त्वरित CSC सेंटर किंवा पीएम किसानच्या वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
तुमच्या खात्यात पैसे आले का? अशी करा तपासणी
शेतकऱ्यांना पैसे आले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत:
1. SMS अलर्ट:
हप्ता जमा झाल्यावर बँककडून तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो. हा सर्वात जलद आणि थेट मार्ग आहे.
2. ऑनलाइन बँकिंग / मोबाइल अॅप:
नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग वापरत असाल, तर ‘स्टेटमेंट’ किंवा ‘बॅलन्स चेक’ ऑप्शनवर क्लिक करून हप्ता जमा झाला आहे का ते पाहता येते.
3. पासबुक एंट्री:
जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट केल्यासही पेमेंटची माहिती मिळू शकते.
4. PM Kisan वेबसाइटवर स्टेटस तपासा:
पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा
केंद्र सरकारने योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. शेतीचा खर्च वाढत असताना ही रक्कम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरते. हंगामात बियाणे, खतं आणि इतर प्राथमिक खर्च भागवण्यासाठी हा हप्ता अनेकांना उपयोगी ठरतो.
आजचा हप्ता मिळणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वरील पद्धती वापरून स्वतःचे स्टेटस तपासणे अत्यावश्यक आहे. ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांना आज रक्कम मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सरकारकडून उर्वरित लाभार्थ्यांची पडताळणी पुढील काही दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.