धक्कादायक! तिकीटासाठी शरीरसुखाची मागणी, ठाकरे गटाच्या माजी आमदारवर महिलेचा गंभीर आरोप

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पिंपरी विधानसभा समन्वयक यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केला आहे.

धक्कादायक!  तिकीटासाठी शरीरसुखाची मागणी, ठाकरे गटाच्या माजी आमदारवर महिलेचा गंभीर आरोप

शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी आमदारावर महिलेने गंभीर आरोप केला आहे. “जे दाखवायचं ते दाखवत नाहीस” असे बोलून पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी महानगरपालिका निवडणुकीचे तिकीट कापल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पिंपरी विधानसभा समन्वयक यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, शिवसेनेमध्ये गेले आठ वर्ष झाले काम करत असून पिंपरी विधानसभा समन्वयक म्हणून पक्ष वाढीसाठी काम केले आहे. पक्ष न्याय देईल या हेतूनेच प्रभागांमध्ये अनेक उपक्रम राबवले व अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. कामे करत असताना पक्षाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी वारंवार शरीर सुखाची मागणी करून हीन वागणूक दिली आहे असा आरोप महिलेने केला आहे.

 कामानिमित्त त्यांच्या पिंपरीतील कार्यालयात भेटण्यासाठी अनेक वेळा गेले तेव्हा त्यांनी अश्लील नजरेतून बघत “खूप छान दिसतेस, आज साडी चांगली आहे” म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असही त्या म्हणाल्या.   पक्षाचे काम न करणाऱ्या निष्क्रीय गोपाळ मोरे या कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यास राजीनामा देण्याचा दबाव पक्षावर चाबुस्कावर यांनी आणला. एका कार्यकर्तासाठी जिल्हा प्रमुख राजीनामा देतो का? या गोष्टीचा पक्षाने विचार करावा? पक्षाला वेठीस का धरले होते ?  असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number