क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यनच्या खानच्य जामीनावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने अखेर आर्यनसह अरबाज आणि मुमनुन यांचा जामीन मंजूर केला आहे. मात्र आर्यनच्या जामीनावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक नवे ट्विट केले आहे’. ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
समीर वानखेडे यांच्या विरोधात लढाई सुरूच राहणार असल्याचे नवाब मलिकांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. क्रूझ ड्रग्जप्रकरणात न्यायालयाने आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांचा जामीन मंजूर केल आहे. त्यामुळे ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असे ट्विट नवाब मलिकांनी केले आहे.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 28, 2021
‘ज्या समीर वानखेडेंनी क्रूझ प्रकरणात या मुलांना तुरूंगात टाकले, तेच आता घाबरले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. ही चौकशी सीबीआय आणि एनआयएकडे द्यावी अशी मागणी मलिकांनी न्यायालयात केली होती. लोकांना तुरूंगात टाकणारे आता स्वत: तुरूंगात जाण्यापासून घाबरत आहेत. समीर वानखेडेंचा बोगस कारभार समोर येत आहे. वानखेडेंनी जे कारनामे केले आहेत त्याचीच त्यांना भीती वाटत आहे,’ असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.