Petrol-Diesel Rate Today : आता बिनधास्त टाकीच्या गाड्या करा फुल्ल! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, महाराष्ट्रासह…

देशातील तेल विपणन कंपन्या (ओएमसी) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल आणि डॉलर-रुपया विनिमय दरावर आधारित नवीन दर जाहीर करतात.

Petrol-Diesel Rate Today : आता बिनधास्त टाकीच्या गाड्या करा फुल्ल! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, महाराष्ट्रासह…

सध्या देशात इंधनाच्या किंमतींमध्ये चढउतार होत असलेले पाहायला मिळत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होत आहे. पेट्रोल-डिजेलच्या दरातही बदल होताना दिसतात. याचा परिणाम सर्वसामान्याच्या खिशावर होत असलेला दिसून येतो. सकाळी ६ वाजता, देशातील तेल विपणन कंपन्या (ओएमसी) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल आणि डॉलर-रुपया विनिमय दरावर आधारित नवीन दर जाहीर करतात.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. सोमवारी जागतिक बेंचमार्क मानले जाणारे ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ११२.१७ डॉलरवर पोहोचले, तर अमेरिकन क्रूड (WTI) देखील १०० डॉलरच्या उंबरठ्यावर आहे. 

हेही वाचा – LPG Gas Crisis : सरकारचा मोठा निर्णय, घरगुती वापराचा सिलेंडर आता 14.2 किलो नाही तर… 

 महाराष्ट्रात पेट्रोल ७ पैसे आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त झाले आहे. सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर १०५.४३ रुपये आहे. तर डिझेलचा दर ९१.९४ इतका आहे. तसेच गुजरातमध्ये पेट्रोल १९ पैसे तर डिझेल १७ पैशांनी स्वस्त झाले आहे.  कर्नाटक पेट्रोलच्या दरात ४९ पैशांची मोठी कपात झाली आहे. मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी दरांमध्ये घट झाली आहे.

२३ मार्च, २०२६ रोजी प्रमुख शहरांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर खालीलप्रमाणे 

नवी दिल्ली: पेट्रोल ९४.७२ रुपये | डिझेल ८७.६२ रुपये

मुंबई: पेट्रोल १०४.२१ रुपये | डिझेल ९२.१५ रुपये

कोलकाता: पेट्रोल १०३.९४ रुपये | डिझेल ९०.७६ रुपये

चेन्नई: पेट्रोल १००.७५ रुपये | डिझेल ९२.३४ रुपये

अहमदाबाद: पेट्रोल ९४.४९ रुपये | डिझेल ९०.१७ रुपये

बंगळूरु: पेट्रोल १०२.९२ रुपये | डिझेल ८९.०२ रुपये

हैदराबाद: पेट्रोल १०७.४६ रुपये | डिझेल ९५.७० रुपये

जयपूर: पेट्रोल १०४.७२ रुपये | डिझेल ९०.२१ रुपये
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number