Petrol Diesel Rate: इंधन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर; तुमच्या खिशावर किती भार?

या दरवाढीमागे अमेरिका आणि इराण यांच्यातील थांबलेल्या शांतता चर्चेचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर होर्मुजच्या सततच्या अडथळ्यांमुळे तेलवाहतूक प्रभावित झाली आहे.

Petrol Diesel Rate: इंधन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर; तुमच्या खिशावर किती भार?

नवी दिल्ली: देशातील इंधन बाजारात आज (मंगळवार, 28 एप्रिल 2026) स्थैर्याचे चित्र दिसून आले असून, प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे आणि अडथळ्यांमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत इंधन दरांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटर इतकाच कायम राहिला आहे. त्याचवेळी आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकाता येथे 105.45 रुपये, बंगळूर येथे 102.92 रुपये, तर चेन्नईमध्ये 100.80 रुपये प्रति लिटर असा पेट्रोलचा दर नोंदवण्यात आला आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

डिझेलच्या दरांमध्येही आज कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये डिझेलचा दर 87.67 रुपये प्रति लिटर आहे, तर मुंबईमध्ये तो 90.03 रुपये प्रति लिटर इतका आहे. चेन्नईमध्ये डिझेल 92.39 रुपये, कोलकातामध्ये 92.02 रुपये आणि बंगळूरमध्ये 90.99 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्येही डिझेलच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत आहे.

हेही वाचा: IPL 2026 RCB vs DC : अवघ्या 75 धावांत दिल्लीची धूळधाण! आरसीबीने 39 बॉलमध्ये सामना संपवत मिळवला एकतर्फी विजयाचा तडाखा

दरम्यान, जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, ब्रेंट कच्च्या तेलाचा दर 106 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे, तर अमेरिकन कच्च्या तेलाचा दर 95 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. गेल्या आठवड्यात या दोन्ही बेंचमार्कमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, ही वाढ युद्धजन्य परिस्थितीनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक झेप मानली जात आहे.

या दरवाढीमागे अमेरिका आणि इराण यांच्यातील थांबलेल्या शांतता चर्चेचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर होर्मुजच्या सततच्या अडथळ्यांमुळे तेलवाहतूक प्रभावित झाली आहे. जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी जवळपास पाचवा हिस्सा या मार्गातून जातो, त्यामुळे येथे निर्माण झालेली अडचण जागतिक पुरवठ्यावर थेट परिणाम करत आहे.

तेलवाहू जहाजांची मर्यादित हालचाल आणि पुरवठ्यातील घट यामुळे जागतिक बाजारात तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्यातरी देशांतर्गत इंधन दर स्थिर असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारातील या घडामोडींचा परिणाम पुढील काही दिवसांत भारतीय ग्राहकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता जागतिक तेल बाजारातील हालचालींकडे लागले आहे.  

हेही वाचा: Train Accident: दोन ट्रेनची समोरासमोर भीषण धडक; मृतदेहांचा खच, 81 जण रक्ताच्या थारोळ्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number