Petrol Diesel Rate Today: भारतावर इंधन दरवाढीचं संकट? पाहा मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

मध्य आशियातील तणावामुळे ब्रेंट क्रूडच्या किमती 95.89 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.

Petrol Diesel Rate Today: भारतावर इंधन दरवाढीचं संकट? पाहा मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली: मध्य आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. इराणने अमेरिकेसोबतच्या दुसऱ्या टप्प्यातील चर्चेला नकार दिल्यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये प्रति बॅरल 5.51 डॉलरची वाढ झाली असून त्या सुमारे 95.89 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.

तरीही जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिर ठेवण्यात आले आहेत. अनेक राज्यांमध्ये आगामी निवडणुका असल्याने सरकार इंधनदर वाढवण्याबाबत सावध भूमिका घेत असल्याचे मानले जात आहे. मात्र काही खासगी तेल कंपन्यांनी किंमतींमध्ये वाढ केली आहे.

शहरनिहाय पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्ली (पेट्रोल 94.77 रुपये, डिझेल 87.67 रुपये)

मुंबई (पेट्रोल 103.50 रुपये, डिझेल 90.03 रुपये)

कोलकाता (पेट्रोल 105.45 रुपये, डिझेल 92.02 रुपये)

हैदराबाद (पेट्रोल 107.46 रुपये, डिझेल 95.70 रुपये)

हेही वाचा: Gold Silver Rate Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ! आज तोळा कितीला? खरेदीपूर्वी तपासा प्रमुख शहरांतील दर

चेन्नई (पेट्रोल 100.90 रुपये, डिझेल 92.48 रुपये)

लखनौ (पेट्रोल 94.85 रुपये, डिझेल 87.99 रुपये)

अहमदाबाद (पेट्रोल 94.68 रुपये, डिझेल 90.35 रुपये)

इंदूर (पेट्रोल 106.81 रुपये, डिझेल 92.18 रुपये)

नाशिक (पेट्रोल 104.76 रुपये, डिझेल 91.27 रुपये)

पटना (पेट्रोल 103.82 रुपये, डिझेल 91.84 रुपये)

पुणे (पेट्रोल 105.60 रुपये, डिझेल 90.35 रुपये)

शेजारील देशांमध्ये पेट्रोलचे दर भारताच्या तुलनेत अधिक आहेत. बांगलादेशमध्ये पेट्रोल सुमारे 90.95 रुपये प्रति लिटर आहे, तर म्यानमारमध्ये ते 146.82 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे.

पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 122.42 रुपये प्रति लिटर आहे. चीनमध्ये तो 130.11 रुपये प्रति लिटर आहे. श्रीलंकेत पेट्रोल 134.38 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर नेपाळमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी सुमारे 136.86 रुपये मोजावे लागत आहेत. 

हेही वाचा: Suntera Pawar: बारामतीत प्रचाराचा धुराळा! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून धनगर समाजाचे जाहीर आभार; नक्की का मानले आभार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number