गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी ८४-८४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांमध्ये नवव्यांदा इंधनात दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दरवाढीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिल लिटर ११६.७२ रुपये झाले आहे तर डिझेल १००.९४ प्रतिलिटर रुपये झाले आहे.
मुंबई पेट्रोल ११६.७२ डिझेल १००.९४
औरंगाबाद पेट्रोल ११६.५३ डिझेल ९९.२३
कोल्हापूर पेट्रोल ११५.७१ डिझेल ९८.४७
पुणे पेट्रोल ११५.३७ डिझेल ९८.१२
नागपूर पेट्रोल ११५.८० डिझेल ९८.३७