Ajit Pawar Sunetra Pawar : दादांच्या नावाचा वापर करण्यापूर्वी परवानगी लागणार! सुनेत्रा पवारांच्या पत्रात नेमकं काय?

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरनार्थ त्यांच्या नावाच्या योजनाक, अनेक ठिकाणी त्यांचे स्मारक, त्यांच्या नावाने ट्रस्ट सुरू करणे अशा विविध मागण्या केल्या जात होता.

Ajit Pawar Sunetra Pawar : दादांच्या नावाचा वापर करण्यापूर्वी परवानगी लागणार! सुनेत्रा पवारांच्या पत्रात नेमकं काय?

28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. अजित पवार यांना आता बराच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरनार्थ त्यांच्या नावाच्या योजनाक, अनेक ठिकाणी त्यांचे स्मारक, त्यांच्या नावाने ट्रस्ट सुरू करणे अशा विविध मागण्या केल्या जात होता. तसेच यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने शैक्षणिक, सामाजिक संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्ट सुरू करण्यासाठी अनेकांकडून पुढाकार घेतला जात आहे. मात्र त्यांच्या नावाचा गैरवापर करत त्यांचे नाव वैयक्तिक किंवा व्यावसायिक स्वार्थासाठी वापरण्याची शक्यता वर्तावली जात आहे. यचपार्श्वभूमिवर पवार कुटुंबियांच्या वतीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

हेही वाचा- Reliance Oil Refinery: युद्धाच्या वणव्यात दिलासा देणारी बातमी; अमेरिकेत 50 वर्षांनंतर उभी राहणार नवी ऑइल रिफायनरी, भारताच्या ‘रिलायन्स’ची मोठी गुंतवणूक
अजित पवार यांच्या नावाने कोणतेही नवीन उपक्रम राबवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची अधिकृत लेखी परवानगी घेणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयाने धर्मादाय आयुक्तांना कडक निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. दरम्यान राज्यातील सर्व सार्वजनिक संस्था आणि नोंदणी कार्यालयांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सार्वजनिक ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यासाठी देखील अधिकृत लेखी परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नावाने चालणाऱ्या उपक्रमांमध्ये पारदर्शकता येणार असून, संशयास्पद संस्थांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number