‘राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना जनता जागा दाखवून देईल’

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. महिनाभरापूर्वी शरद पवारांनी सुध्दा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राष्ट्रवादीत वातावरण चांगलेच तापले होते. काल अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर शरद […]

‘राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना जनता जागा दाखवून देईल’

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. महिनाभरापूर्वी शरद पवारांनी सुध्दा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राष्ट्रवादीत वातावरण चांगलेच तापले होते. काल अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर शरद पवारांनी माझे या गोष्टीला समर्थन नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शरद पवार काय बोलतात, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले होते. काही वेळापूर्वी पवारांनी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर प्रीती संगमावरून भाजपावर जोरदार हल्ला केला.

ज्यावेळी शरद पवार कराडमध्ये पोहोचले, त्यावेळी तिथं पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, इत्यादी नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाजपचे सरकार सध्या देशासह महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने मागच्या कित्येक महिन्यांपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. सध्या समादविघातक जी काही प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात आज सगळ्यांनी आवाज उठवण्याची गरज आहे. अशाच पद्धतीचे काम आपण महाराष्ट्रात करीत होतो. पण सध्या एकोप्याने राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे पवारांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number